पान:रायगड किल्याचें वर्णन.pdf/७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३)

शीनें जरी चाललें व वाटेंत दोन तीन ठिकाणी दहा पांच मिनिटें विश्रांति घेतली तरी किल्ल्याचे महा दरवाजास पोचण्यास सुमारे ११ वाजतात. नंतर तसेंच गंगासागर तलावाकडे जावें. तेथें नजीकचे मनोऱ्यात किंवा तळ्याचे कांठी झाडाखाली भोजन किंवा फराळ वगैरे करणें असेल तर करून सर्व स्थळे पाहण्यास लागावें. ते संध्याकाळचे ५ वाजेपर्यंत हिंडावें. याप्रमाणे सर्व पहाणें पुरे झाल्यावर (वस्तीस रायगडावर राहिल्यास हरकत नाही. परंतु पांच चार सोबती असावे, व पांघरुणाची मजबुती असावी.) नंतर वस्तीस पांचाडगावी यावें, किंवा महाडाकडे न येतां परभारे नागोठण्यावरून परत येण्याचा विचार असला तर 'वाडी' गांवीं वस्तीस यावें. हा वाडी गांव जे वेळेस रायगड चांगल्या स्थितींत होता, ते वेळेस मोठे भरभराटीचा होता. या गांवीं त्या वेळापासून वसत आलेल्या कित्येक सोनारांची घरें आहेत. या सोनारांपैकी एक दोन असामी किल्ल्यावरील माहिती सांगण्यांत व स्थळे दाखविण्यांत मोठे कुशल आहेत, व त्यांस बऱ्याच दंतकथाही माहीत आहेत. त्या दंतकथा जरी कित्येक अतिशयोक्तीच्या आहेत, तरी त्या ऐकून मनाला एकप्रकारचा आनंद व उल्हास प्राप्त होतो. या वाडी-


  • किल्ला पहाण्यास सोईचे दिवस फालगून, चैत्र, वैशाख महिन्यांतील पौर्णिमेनजिकचे होत.

x रायगड पहाण्यास जांणारांनी यांजपैकी एकास व