पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/17

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

निंदक असे जे आहेत त्यांच्याही मनामध्ये सत्य, न्याय याची प्रतिष्ठापणा होऊ दे. संत तुकडोजी म्हणतात. गावाजता 'सौंदर्य रमो घराघरात, स्वर्गीयांपरी। ही नष्ट होऊ दे विपत्ती भीती बावरी।' 'मला तुकड्याला मात्र सदासर्वदा सेवेत असू दे।।' हेच त्याचे मागणे आहे. . . . अंधश्रद्धेला फाटा : संत तुकडोजी महाराजांनी समाजातील अंधश्रद्धेचे दर्शन प्रखरतेने घडविले. ते एके ठिकाणी लिहितात. 'कोणी करणी, कौटाळ म्हणती। कोटी पिशाच्चास भारिती। । औषधेही न देता रोगी मारती। मूर्खपणाने।। भगत, मांत्रिक, अरबाडी जाणते। धुपारे बघती भाविक पोटासाठी नाना मते। फैलविती लोकांमाजी।। कोण ते करविती नवसासायास। थोर देवपूजेचा जोर सोर। रेडे, बकरे, कोंबडे पामर। कापिताति अज्ञानें।। आपल्या अशा प्रखर ओव्यांमधून संत तुकडोजी महाराजांनी जनांना विचाराने जागविण्याचा वसा निष्ठेने चालविला. अधिकारी संत व ढोंगीबुवा यांच्यात गफलत होऊ नये म्हणून खऱ्या संतांचे लक्षण सांगताना महाराज म्हणतात. 'संसारी असोनि संत असती। व्यवहारी राहोनि आदर्श होती।। बुवा न म्हणविताही अधिकार ठेविती। सद्गुरूचा।।' (१६).