पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/18

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ग्रामीण भागातील अडाणी जनतेला धर्माच्या नावाखाली फसविणाऱ्या आणि बुवाबाजी करणाऱ्या लबाड लोकांवर महाराजांनी कडक ताशेरे ओढले आहेत. अंधश्रद्धेच्या विरुद्ध त्यांनी केलेली ही जागृती अपूर्व आहे. दि. २३ जुलै, १९५४ रोजी जपानमधील 'शिमिझ' (Shimiz) या शहरात भरलेल्या विश्वधर्म परिषदेचे संत तुकडोजींनी उद्घाटन केले. त्यांच्या विचार सौंदर्याने आणि वैभवाने तेथील लोक भारावले. परिषद प्रमुखांनी तेथे विश्वधर्म केंद्राच्या स्थापनेसाठी १०,००० मीटर भूमी एका सुंदर पहाडावर देऊ केली. पण तुकडोजी म्हणाले 'मला या मोहात पाडू नका, माझ्या भारतात माझ्यासाठी अजून खूप काम आहे.' तुझ्या स्वरूपी सदा आनंद : ऐका हा भाव जीवाचा। भक्तिविना उद्धार नाही कुणाचा।। तरण्यासी भवसागर सगळा। अवघड हा षड्-रिपूचा मेळा।। पार कराया या कळिकाळा। नाही दुजा कुणी मार्ग निराळा। निज संदेश शीवाचा।। या अभंगात संत तुकडोजी महाराज म्हणतात, 'माणसाने' सरळपणाचे जीवन जगावे. सगळी व्यसने सोडून द्यावीत., सगळ्यांनी परस्पर प्रेम आणि लोभ वाढवावा. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षड्रिपूंच्या मेळ्यात आपण अडकून पडतो, हा भवसागर तरुण जाण्यासाठी भक्तीचाच आधार हा खरा आहे. अनुभवी संतांचे अनुभव घ्यावेत, (१७)