पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/24

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आहे. सतत भयाची भावना मनाला घाबरविते ती पूर्णत: नष्ट व्हावी. माणसाने परमेश्वराच्या ठायी मन, चित्त एकाग्र करून राहावे. परमेश्वराच्या सेवेत माझे मन वसू दे हीच त्यांची देवाजवळ प्रार्थना आहे. हृदय मंदिरात ज्ञान दिवा पाजळावा. आणि शेवटी बोध होतो. 'तू सर्वसाक्षि हे कळले, तुजचि श्रीधरा। तुकड्याची आस ही पुरवी, देई दर्शना।। ग्रामगीता सांगणारे राष्ट्रसंत : संत तुकडोजी महाराजांनी अत्यंत साध्या सोप्या ग्रामीण जनतेला सहज समजेल अशा भाषेत ग्रामगीता लिहिली. सुजाण, प्रगल्भ चिंतन साकार करणारी ग्रामगीता ही तुकडोजींच्या सर्वांना प्रेरक ठरलेल्या प्रतिभेचा अपूर्व चमत्कार आहे. आत्मसंयमनाबद्दलचे चिंतन, मार्गदर्शक विचार, तुकडोजींनी ग्रामगीतेतून मांडलेले आहेत. आपला भारत हा खेड्यांचा देश आहे. महात्मा गांधींजींनी या 'खेड्यांकडे चला' हाच दिलेला संदेश आहे. त्या खेड्यांचा विकास झाला की आपोआपच राष्ट्राचा विकास होईल अशी ग्रामविकसनाची कल्पना संत तुकडोजींची होती. भारतीय समाजातील सर्वच घटकांचा विकास कसा होईल या विषयीची काळजी आहोरात्र तुकडोजींना होती. त्यांचे हे चिंतन ग्रामगीतेत मूर्त झाले आहे. ग्रामोन्नती आणि ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा केंद्रबिंदूच होता. भारतातील ग्रामीण, अतिग्रामीण, दुर्गम भागाची तुकडोजींना (२३)