पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/51

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आत्यंतिक तळमळ आहे. मग ही आर्तभावना, भक्तीची भावना, कोणत्याही माध्यमातून का होईना, प्रगट झाली पाहिजे. त्यासाठी तुम्ही कोणते वाद्य हाती घेतले ते महत्त्वाचे नाही, संतांनी भजनी मार्ग हा, सोपा मार्ग काढला आहे. भक्तीच्या खुणा जनसामान्यांना सुलभतेने कळाव्यात. सर्वसामान्य जणांसाठी भक्तिभाव महाग आणि दुर्बोध होऊ नये, यावर संत तुकडोजी महाराजांचा, कटाक्ष होता. या संदर्भात तुकडोजी महाराजांनीच, एक दाखला दिला आहे. मला वाटते, ते उदाहरण पुरेसे बोलके आहे, ते म्हणतात - 'मी, एकदा एका महात्म्याच्या भजनात गेलो. तो नदीच्या तीरावर दोन गोटे (दगडाचे) घेऊन, सारखा, देवाला दूषण देत होता; पण त्याच्या डोळ्यांतून मात्र सतत अश्रूचे लोंढे वाहत होते. त्याच्या वाणीचे ते शब्द ऐकून मी त्याला विचारले की, 'महाराज! असंच का भजन असते?', यालाच भजन म्हणतात का? तर तो म्हणाला, अरं! तुला जे तसं दिसतं. 'अरं! पती पत्नी यांच्या प्रेमाची भाषा बाहेरच्या लोकांना कशी कळल?, त्याचप्रमाणे ईश्वराच्या आणि भक्तांच्या सुद्धा प्रेमभक्तीच्या अशाच खुणा असतात. तुम्ही भजनात रंगून जा, दंग व्हा' मग तुमच्या अंगी, त्या प्रेमभक्तीच्या खुणा, हळूहळू येतील, आणि मग त्या उलगडतील सुद्धा! यातून तुकडोजी महाराजांनी 'भजनावली'चा हा अगाध महिमा सांगितलेला आहे. तुमच्या माझ्या मनातील, विभिन्न भावनांना, हा ईश्वराच्या दैवी शक्तीचा मार्ग खुला व्हावा, लाभावा. जीवा शिवाचे मिलन व्हावे, म्हणून भजनांच्या माध्यमातून ही भक्ती भावनेची, (५०) -