पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/52

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्योत साधकाच्या जनसामान्यांच्या मनात रुजविली जाते, जागविली जाते. आजच्या नव्या युगाचा धर्म ‘हरिनाम' नामजप “अजित नाम वदो भलत्या मिसे। सकल पातक भस्म करितसे।" 'नावाचे माहात्म्य' हाच मार्ग संतांनी भाविकांच्यासाठी सोपा म्हणून आखून दिला आहे. संत तुकडोजींनी त्याला प्रगाढ श्रद्धा, उत्कट प्रेम आणि सदाचरणाची जोड द्यायला सांगितली आहे. तालासुरांचा कोरडा नाद येथे उपयोगाचा नसतो. तुमच्या जवळ आत्मबल आणि तुमच्या वाणीत तेज पाहिजे. हा तुकडोजी महाराजांच्या उपासकांना मोलाचा संदेश आहे. संत तुकडोजी महाराजांच्या भजनावली : आमुचे प्रेम गुरुपदी राहो। आवडली गुरुमाया, हृदया। आकळावा प्रेम भावे। ऐक रे! सुजना मना। अंतरी इच्छा अशी वाहते सदा रे। काय वर्गु थोरवी गुरूंची। गुरुविण शांति ना मना। शाति ना मनाया गुरुपदि धीर निर्धार। झणि भेट सखया गुरुराया। दृढ धरू गुरूंचे पाय। धन्य सद्गुरुराया। (५१)