पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/55

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

घाबरे होत आहे', असे ते म्हणतात. त्यासाठी 'श्रवणी, मननी, निजध्यासनी, सद्गुरू गुण साठवी' असे गुरुपद तुकड्यादास मागतात. 'धन्य सद्गुरू! वैभव तुमचे, पाहुनिया मन हरी।' अशी त्यांची स्थिती आहे. ही गुरूची नामध्वजा त्यांनी अंबरी, फडकविली आहे. परोपरीने त्यांनी या 'गुरुमाय' ची आळवणी केली आहे, त्याखेरीज अन्य कोणताही उपाय नाही, अशी त्यांची खात्री पटली होती. 'गुरुपदी धरी, निर्धार आधी।' असे ते सांगतात. श्रवणी, मननी, निजध्यासादी भज गुरू वारंवार ही त्याची सर्वसामान्य जनांकडून गुरुभक्तीची अपेक्षा आहे. 'गुरुविण शांति ना मना' हे सगळ्याच सज्जनांचे मत ग्राह्य मानून, संत तुकडोजी महाराज, गुरुपायी सदाचे लीन झाले आहेत. आहे त्याचा अनुभव त्यांना आनंददायी आला म्हणून ते म्हणतात, 'काय वर्णी थोरवी गुरुची, मज आनंदविले,' आणि मग गुरूकडे मागणे, मागतात. 'आमुचे प्रेम, गुरुपदी राहो। मोक्ष नको आणि स्वर्ग नको तो। चित्त गुरु-गुण-गावो।। विस्मृत होऊनि संसारासी, ध्यानी सद्गुरु घ्यावो अशी आपली उत्कट गुरुभक्ती, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी, आपल्या अनेक भावभक्ती रसाने भरलेल्या भजनांमधून साकार केली आहे. संत तुकडोजी महाराजांची ही रसाळ भजने या आशयघनतेमुळेच वारंवार ऐकाविसी वाटतात. (५४)