पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/57

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी या क्रांतिगीतात सामाजिक आशय व्यक्त केला आहे. उदा. 'भेदभाव कशाला? माणसा-माणसात रे' आम्ही क्रांतीचे वीर गडी रे, माणूस द्या, मज माणूस द्या' का व्हावे लहान? आम्ही भारत व्यापी महान : विश्वशांतीचा अमर मार्ग संतांनी शोधला, 'जीवन व्यर्थची घालवू नको रे, वाईट मार्गे चालू नको' भारतीय नरवीर, तू राही सदा सिंहापरी, अशी ही नवक्रांतीची वीणा मंजूळ वाजे रे, अशी आशयगर्भ गीते म्हणजेच महाराजांची लोकप्रिय 'क्रांतिगीता' आहे. ती त्यांची अती आदराने म्हटली जाणारी भजने आहेत. तरुणाला ते सांगतात, संपदा सर्व सर्वांची। संतती राष्ट्रधर्माची। भारत भू गुण कर्माची आहे, उन्नत व्हाया देश। बना गोसावी रे, आणि गोसावी बनून स्वातंत्र्य भारती आले। झोपडीत अजुनि न शिरले। हे कार्य करा जे उरले। तुकड्यादास गमे, युग धर्मचि हा साजे रे, हे सांग सांग तरुणाला। खरे थोरपण कशात आहे, हे एका गीतातून संत तुकडोजी महाराज सांगतात - 'अमर, तरिच मी, नवस्फूर्ती ने करीन पुरुषार्था' आपुला-परका भेद न पाहता, सुखवीन दीन जनता।' पुढे महाराज म्हणतात, ते मोठे लक्षात घेण्याजोगे आहे. (५६)