पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/59

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

MEmmmmmmmmmmmmmmmminentio --- अज्ञान दोन्हीही भरपूर भरलेले आहे. अर्थात् सद्प्रवृत्त आणि सद्प्रेरणा घेणाऱ्यांना, यथार्थ दृष्टी संपन्न माणसाला (वृत्तीने तो मुमुक्षु असल्यानं) ज्ञान प्राप्त होते. आणि मग त्याची ब्रह्मानंदी टाळी लागते. परंतु विकृत दृष्टिकोण असलेल्याने, खरे ज्ञान संपादन न केल्यामुळे, तो सद्प्रवृत्त नसल्याने, त्याने तपश्चर्या, भक्ती, वैराग्य, सन्यास, स्वीकारला अथवा जन्मभर भजने, संकीर्तने करीत राहूनही त्याला कोणताही लाभ होणार नाही. समाजात जेवढया म्हणून चांगल्या गोष्टी कथन केल्या जातात, अर्थातच त्या सगळ्या, उन्नतीसाठीच आहेत; यात मुळीच शंका नाही. तथापि माणूस जेव्हा या सगळया चांगल्या गोष्टींचा 'धंदा', 'व्यापार' करू लागतो. ती वस्तू ‘बाजारी' बनवितो, तेव्हा या सर्व गोष्टी केवळ सत्तेचे साधन बनतात. आपल्या स्वत:च्या मोठेपणाचे हत्यार, साधन होते. त्यामुळे या सर्व साधनांना विकृत अवस्था प्राप्त होते. आणि अशा साधनांना जवळ करणारे हे भ्रष्टच होतात. संत तुकडोजी महाराज मोठ्या आत्मीयतेने आणि आस्थापूर्वक सांगतात की मित्रांनो! असे होऊ देऊ नका. मी माझी सगळी भजनावली पवित्र हेतूनेच लिहिली. ज्ञान आणि ध्यान एकाग्र करून, वाढवून देश आणि धर्माच्यासाठी माझ्या या भजनावलीचे लेखन झालेले आहे. त्याचा हाच लाभ, भजन गाणाऱ्यानी घेतला पाहिजे. 'या विचारमंथनाच्या आणि चिंतनाच्या आधाराने, माणसाने स्वत:च स्वत:ला, ज्ञानवान, भक्तिवान, चारित्र्यवान आणि परोपकारी बनविले पाहिजे. तरच या (५८)