पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/60

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भजनभावाचे मोल, विश्वामध्ये प्रभावित होईल, येरव्ही नाही.' असा हा महाराजांनी दिलेला संदेश, आणि त्याच्या पूर्तीसाठी, तुकडोजी महाराजांच्या भजन-पद्यांचा जन्म झाला आहे. तीच महाराजांची खरी प्रेरणा आहे. “सत्ग्यान की, नैन निरखने, भाव का, सुरमा चढालिया। तुकड्यादास कहे, इस तन का, धूप दीप जलवाया हूँ।।" “फल आये, जागृत जीवन में, उमड रही है माया। प्रभू भक्ति का, बाग लगाया।" असे मोठे हृदयमंगम चित्र ते तलीन होऊन रेखाटतात. त्यांना देशोन्नतीची सतत चिंता लागलेली आढळते. “कैसे देश जिएगा" या गीतात, ते परखडपणे लिहितात, __चारित्र्य, फनाही होगा। तब कैसे, देश जिएगा। पानीही, जल जाए, तो कैसे? पंडित गलत करे, तब कैसे? राजा भक्ष्य भरे, तब कैसे? साधुही, भोगी बनेगा।। तब कैसे देश जिएगा।' यासाठी तुकडोजी महाराजांनी सेवाधर्माला प्राधान्य दिलेले आहे. एका पदात ते म्हणतात - 'पहिले सेवा, फिर भगवान', जर प्रथम सेवा केली, तर भगवंताची प्राप्ती झाली असती - घरच्याघरी आपले मनोरथ, सेवाधर्म पाळल्याने पूर्ण होतात. असे हे सेवाधर्माचे माहात्म्य, जागोजाग त्यांनी आपल्या भजनातून समाजावर, बिंबविले आहे. 'ये मानव, व्यसन को छोड दे,' 'समय दान दे दो,' 'कैसी, दिवाळी मनाऊ मै?' 'जीवन के उजारे तुम हो,' (५९)