पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/61

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

'कोयल गाने लगी,' अशा कितीतरी त्यांच्या हिंदी पद रचना विलोभनीय आहेत. त्यात एकाचवेळी राष्ट्रभक्ती, देशोद्धाराची तळमळ आणि आत्मोन्नतीचा, सर्वसामान्यांना दिलेला संदेश, प्रगट झाला आहे. आश्रमधर्म आणि ग्रामगीता : संत तुकडोजी महाराजांच्या आज गावोगाव, घराघरात पोहचलेल्या 'ग्रामगीते' च्या तिसऱ्या अध्यायात 'आश्रमधर्म' स्पष्ट करून सांगितला आहे. समाजशास्त्राच्या अध्ययनातही या आश्रम व्यवस्थेचा समावेश असतो. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि सन्यासाश्रम हे चार आश्रम रुढ आहेत. संत तुकडोजी महाराज या आश्रमाबाबत म्हणतात. 'ब्रह्मचारी राहणे' ही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. परंतु ज्यांनी ब्रह्मचर्यव्रत स्वीकारले आहे त्यांनी मोठ्या निष्ठेने ब्रह्मचर्य पालन केले पाहिजे. विषयवासना आणि त्यातून उद्भवणारा अध:पात टाळला पाहिजे. ब्रह्मचर्याचा कालावधी २४ वर्षांचा आहे. या काळात संयम पाळावा. त्यामुळे संसार कार्य थांबत नाही. संत तुकडोजींच्या मतानुसार प्रत्येकाने संयम पाळावा. उन्नतीसाठी सर्व चारही आश्रमात संयमाची गरज आहे. बुद्धिमान माणसाने स्वैरवृत्तीने वागू नये पशूवत जीवन जगू नये. त्यामुळे त्याचा कोणताच आश्रम आणि संसार सुखाचा होणार नाही. संसार पंथ मोडू नये. प्रजाजनन खंडू नये. म्हणून (६०)