पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/62

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

MAHADRAKAN HAMARI mam mininamamalinimum ब्रह्मचर्याश्रमातील ठेवा जपावा आणि सुयोग्य वेळी गृहस्थाश्रमात पदार्पण करावे. धर्मपालन गृहस्थाश्रमात आहे ते निसर्ग नियमांच्यानुसारच आहे. त्यातूनच गावाचा, व्यक्तीव्यक्तींचा, पर्यायाने राष्ट्राचा विकास घडून येतो. हीच समाजधारणा असते. असे हे जीवनातील टप्पे सत्कारणी लावावे. संयमाने जो तो, प्रत्येक आश्रम आपण सार्थकी लावावा. ब्रह्मचर्य, वैवाहिक, वानप्रस्थी जीवन त्या त्या अपेक्षेनुसार संयमाने जगावे. ___“जयासी साधे इंद्रियदमन, वृत्ती सत्कार्थी रमे पूर्ण।।" या उक्तीप्रमाणे आश्रमधर्म सफल होत असतो. संत तुकडोजी सांगतात. गृहस्थाश्रमात अधिक जबाबदारी वाढत असते. आपले कुटुंब, पत्नी, ज्ञानी जन यांना बरोबर घेऊनच जीवनमार्ग सुधारावा लागतो. प्रपंचाचा भार पेलावा. समाजधर्म पाळावा. यासाठीच संतांचे प्रबोधन आहे. माणसाने सात्विक मार्गाचा अवलंब करावा. आचरण शुद्ध ठेवावे. पती पत्नी दोघांनी संयम पाळावा. तरच हा गृहस्थाश्रम यशस्वी होतो. आपले नातेवाईक, समाजपरिवाराला आपल्या वागण्याने - मोह पाडावा. अशा रीतीने आपण वागावे, साधुसंतांच्या सहवास मार्गदर्शनाने आपले ऋषिऋण फेडता येईल. सत्संग, अध्यात्म गृहस्थाश्रमींना तारतो. देशसेवा, संस्कारक्षम भावी पिढी घडवून पितृऋण फेडता येते. भगवंताच्या, धर्माच्या अधिष्ठानाने देवऋण फेडता येते. 'उचित करावी कुटुंब, जीव, ग्राम सेवा' याला फार महत्त्व तुकडोजींनी दिले आहे. पंक्ती प्रपंच न करता समत्व बुद्धी आपण हे खऱ्या गृहस्थाश्रमाच लक्षण आहे. माणूस आणि (६१)