पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/64

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

": - - त्यांच्याबद्दलचा आदरभाव व्यक्त होतोच. राष्ट्रसंत तुकडोजी कर्मयोगी होते. म्हणून या कर्मयोगी संताचे चरित्र हा आपल्या समाजाचा फार मोठा ठेवा बनला आहे. त्यांचा कार्याचा सुगंध दीर्घकाळ दरवळत राहतो, तो याचमुळे! आपल्या अज्ञानातून सामाजिक परवशता, अंधश्रद्धा दारिद्रय जन्माला येत असत. त्यासाठी तुकडोजींनी शिक्षण, श्रमप्रतिष्ठा, लोकजागरण, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, आरोग्यसाधना, ग्रामस्वराज्य असे विविध उपक्रम आणि प्रकल्प, समर्थग्राम निर्मितीसाठी हाती घेतले. आणि समर्थग्रामातूनच समर्थ भारताच्या निर्मितीला चालना दिली. असे समाज आणि देशसुधारण्याचे काम तुकडोजींनी केले. त्यासाठी त्यांनी हातात खंजिरी घेतली. आणि आपल्या हृदयभेदी शब्दाबरोबर गगनभेदी हाक दिली. सारा समाज जागविला. त्याचे सोपे तत्त्वज्ञान भजन संस्थेच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य लोकांत रुजविले. कर्म, अकर्म आणि विकर्म या भगवद्गीतेतील तत्त्वज्ञानानुसार या महान कर्मयोग्याला आत्मोन्नतीचा खरा मार्ग गवसला. जनमाणसातही या कर्मयोग्याबद्दल दृढ श्रदधा निर्माण झाली आहे. राष्ट्रसंत तुकडोजींची सामाजिक जाणिव प्रगल्भ होती. आणि समाजसुधारणेसाठी त्यांनी संपूर्ण समर्पण केले होते. त्यांची उपलब्ध ग्रंथसंपत्ती याची आज साक्ष आहे. 'ग्रामगीता' पाहा किंवा त्यांच्या मराठी हिंदी भजनावलीच्या पुस्तिका पाहा त्यातून आपल्याला हाच प्रत्यय येतो. 'ग्रामनिर्माण कला' या तुकडोजींच्या ग्रामगीता रहस्यातील या पंचकाने श्रमप्रतिष्ठेचे मोल पटवून दिले आहे. (६३) ANIMOONAKSHATRAPARAMABAHRAdaaaaaaaaaaaaaaaaaaaKAAMRAPALIKAAST A NAME