पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/65

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

.-. --.. Bars राष्ट्र बलशाली करण्यासाठी, समाजाला ग्रासणाऱ्या रुढी परंपरा, ज्या घातकी ठरतात त्या नाहिशा केल्या पाहिजेत. याच भावनेतून वंदनीय तुकडोजींनी समाजजीवनाच निरीक्षण केले. ते अनुभवले, नीट समजून घेतले. आणि मग मानवतेचे पुजारी होऊन त्यांनी समाजक्रांतीची मशाल हातात घेतली. आयुष्य समाजकार्याला वाहिले. विदर्भात त्यांचा जन्म आणि वावर असला तरी त्यांचे कार्य मात्र विश्वव्यापी बनले. ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग, हे तिन्ही योग त्यांना साधले. त्यांची देशभरची भटकंती, मानवतेची पुरस्कर्ती ठरली. “मनुष्य देहाचेनि ज्ञाने। सच्चिदानंद पदवी घेणे' याची प्रचीती आणि सिद्धी त्यांना प्राप्त झाली. 'बहुजनहिताय, बहुजनसुखाय' या उक्तीप्रमाणे त्यांनी केलेले कार्य लक्षात घेऊन राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी त्यांना 'राष्ट्रसंत' म्हणून एवढ्यासाठीच सन्मानित केले होते. अक्षराची फारशी ओळख नसूनही संत तुकडोजी यांनी आपल्यासाठी अक्षर वाङ्मय ग्रामगीतेच्या रूपाने मागे ठेवले. हयातीत आपली 'अमृताहुनी गोड वाणी' समाजात सतत प्रवाही ठेवली. कर्मयोग्याची भूमिका बजावून केलेली मानवमंदिराची निर्मिती, गुरुकुलाची उभारणी आज त्यांच्या महान कार्याची साक्ष देत आहेत. ते म्हणतात - 'कामाकरिता जाती केली। काम विसरुनी जातच धरली' ही अशी स्थिती, जातीला मूठमाती देऊन संपवावी. (६४)