पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/66

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

समाजऋणाचे भान : आपल्याकडे देवऋण, ऋषिऋण, पितृऋण अशा ऋणांतून उतराई होण्याच्या कल्पना मांडलेल्या आहेत. पण चवथे ऋणं म्हणजे 'समाज ऋण' फार महत्त्वाचे आहे. संत तुकडोजी महाराजांनी समाजऋणालाच आपल्या जीवनात सगळ्यात महत्त्वाचे स्थान दिले आहे. एक कृतिशील समाजसुधारक म्हणून त्यांनी समाजाला दिशा प्राप्त करून दिली. देवभक्ती आणि देशभक्ती या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. 'धर्म' म्हणजे मनुष्यात स्वभावतः असलेल्या सामर्थ्याचा आविष्कार होय. असे आपल्या समर्थवाणीने तुकडोजींनी सांगितले. उदार हृदयाचे, विशाल बुद्धीचे आणि थोर कृतीचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज खरे कर्ते समाजसुधारक होते. म्हणूनच त्यांच्या नावाने विविध प्रकल्प आणि उपक्रम हाती घेतलेले आहेत. एवढेच नव्हे तर, नागपूर विद्यापीठाला संत तुकडोजी महाराजांचे नाव दिलेले आहे. त्यामागे त्यांची कठोर तपश्चर्या आहे. त्यांनी अखंडपणे जीवनभर चालविलेला जनसेवेचा, कवित्वाचा आणि आपल्या हृदयस्पर्शी अमोघ वक्तृत्वाचा. संगीताचा 'ध्यास' आहे. त्यांनी राष्ट्राभिमान जोपासला. सर्वधर्म समभाव आणि परधर्म सहिष्णुता संवर्धन केले. सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव करून दिली. एका साध्या खंजिरी वाद्याची ही सगळी करामत आहे. आजही तिचा आवाज निनादत आहे... 'अवघेचि सुखी असावे' (६५) - - - RS - - - - - -