पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/67

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सबका भला करो यही आवाज करेंगे' असे म्हणत राष्ट्रसंत तुकडोजींनी समाजपरिवर्तनाची चळवळ हयातभर चालविली आहे. समाजाला खडबडून जागे केले. 'विचारे शुद्धता: आचारे दृढता' या न्यायाने उक्ती आणि कृती यात एकवाक्यता ठेवली. समाजपरिवर्तनाचे अग्निकुंड सतत धगधगत ठेवले. बाह्य अवडंबरापेक्षा वस्तुस्थितीचे दर्शन त्यांनी समाजाला घडविले. कालोचित तेवढेच स्वीकारावे कालबाह्य असेल ते टाकून द्यावे, हे त्यांचे धोरण होते. एखाद्या उदाहरणाने समाजाचे स्वरूप कधीच लक्षात येत नाही. त्याच विस्तृत आणि सखोल सत्यान्वेषी, ज्ञान करून घेऊनच खऱ्याखुऱ्या 'समाजस्थितीचा उलगडा होऊ शकतो असे त्यांनी आग्रहानी मांडले. ११ नोव्हेंबर, १९४३ ला तुकडोजी यांनी श्री गुरुदेव सेवा मंडळाची याच हेतूने स्थापना केली. मानवसेवा हीच खरी देवपूजा त्यांनी मानली. ‘जनसेवा हीच ईश्वर सेवा' आणि 'जगाला प्रेम अर्पावे' 'बलसागर भारत होवो' हीच कल्पना सानेगुरुजींनी मांडली होती. तेच ध्येय संत तुकडोजी महाराजांचे होते. देशभक्त हा कनवाळू असतो. उपेक्षित अलक्षितांच्या सेवेत आनंद घेतो. समाजातील रंजल्या गांजल्यांसाठीच तो जगतो. सामाजिक समरसता, प्रस्थापित झाल्याशिवाय, खरा सामाजिक न्याय अस्तित्वात येऊ शकत नाही. निकोप समाजरचना निर्माण होत नाही. त्यासाठी सर्व भेदभाव विसरून, विषमतेला. नाहीसे करूनच, माणसातले ‘सत्व' जागे करून, समाजाची (६६)