पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/68

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उन्नती साधू शकेल हे तुकडोजी महाराजांच्या स्वीकृत तत्वज्ञानाचे सारसर्वस्व होते. गुरुदेव सेवा मंडळ, प्रार्थना मंदिर, ग्रामगीता, ग्रामनिर्माण, आनंदामृत, श्रमदान, विश्वशांती सप्ताह (१९४३) बलिदान बंदी, नशाबंदी, आखाडा संघटनेना अशा विविध उपक्रमांतून आणि प्रकल्पातून त्यांनी समाजाची निष्काम सेवा केली. नवी जीवनदृष्टी समाजाला दिली. भगवद्गीतेचे हे सक्रीय रूप। प्रगट झाले आपोआप। अर्जुनासम व्हावे महाप्रताप। सर्व ग्रामीण म्हणौनी ॥१०१।। श्री ज्ञानराज गुरु माऊली। त्यांच्या कृपादृष्टीची साऊली। परंपरेने फळासि आली। ग्रामगीता स्वरूपाने ॥१०४॥ (अध्याय ४१)

miREHENS ..............mannmins

सारे काही आत्मविकासार्थ : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी, चारही विहित आश्रमधर्म उत्तमरीतीने पाळल्यास व्यक्तिगत कल्याण तर होतेच, शिवाय समाजधारणा होते, असे मानले. राष्ट्रसेवा अध्यात्मसाधनेतून साधते. सन्यासाश्रम मोक्षप्राप्तीसाठी आवश्यक आहे. संत म्हणतात, “सन्याशी सर्वाशीच होणे आहे। त्याविण मोक्षाची नाही सोय।। मोक्षावाचोनि तरणोपाय दुसरा कोठे?" आत्मविकासाला वयोमर्यादा नसते, असे महाराज म्हणतात. अतिवृध्दांनाही तो साधता येऊ शकतो. या तुकडोजींच्या विचाराने फार मोठा दिलासा वयोवृध्दांना मिळतो. - -. (६७)