पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/69

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

.. . मात्र बहिरंग दीक्षेचे सोंग कोणी घेऊ नये. संस्कार महत्त्वाचे, त्यावर विश्वास ठेवावा. धर्म दीक्षेबरोबरच महत्त्वाचे, व्रतदीक्षा, गुरुदीक्षा, संप्रदाय दीक्षा, आश्रमदीक्षा, कार्यदीक्षा या सर्वच दीक्षांनी माणसाचे मन तयार होते. त्यासाठी नित्यकर्म-आचरण करावे. “जी दीक्षा ज्यानं घ्यावी। त्यानं ती पथ्ये सांभाळावी, वृत्ती वाकडी होऊ न द्यावी। वाईट कर्मे।।" दीक्षा घेतात, पण पेलवत नाही. त्यामुळे फटफजिती होते. यासाठी संत तुकडोजी महाराजांनी एक चांगले उदाहरण दिले आहे. एका अशाच साधकाचे विनोद बुद्धीने मोठे हास्यास्पद वर्णन तुकडोजींनी केले आहे. “एकदा एका साधकाला वैराग्य आले. त्याने मग घरदार सोडले. तो लंगोटीवर वनात आंघोळ करू लागला. स्नानानंतर तो लंगोटी वाळविण्यासाठी एका झाडावर टाकू लागला. तिथे उंदीर येऊन त्याची लंगोटी कातरू लागला. कुरतडू लागला. तो लंगोटी मागायला पुन्हा पुन्हा गावी जाऊ लागला. मग लोकांनी त्याला मांजराची पिले पाळायला सुचविले. त्याने तुझ्या लंगोटीचे राखण होईल. त्याने मांजरीची पिले पाळली; पण त्या सन्याशाला पिलांच्या खाण्यापिण्याची काळजी लागली. मग गावकऱ्यांनी त्याला गाई पाळायला सूचविले म्हणजे मग शिवाय चांगला दही, दूध, लोण्याचा ‘सात्विक' आहारही तुला मिळेल. म्हणून त्या विरक्ताने गोधन जमविले. पण मग त्याला चाऱ्याची चिंता लागली. तेव्हा लोक त्याला म्हणाले थोडी शेती घ्या चाऱ्यासाठी. तीही घेतली. मग (६८) . .. . . . JATA El- -