पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/70

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

... त्याची गडी माणसे आली. धनधान्य जमा झाले. पण हे सांभाळायचं कसे आणि कुणी? असा प्रश्न पडला. लोक म्हणाले, 'असं करा! जो चोर नाही, आळशीही नाही, असा इमानदार माणूस तुम्हाला मिळणार नाही. शेवटी आपले मन आणि धन सांभाळावे म्हणून त्या वैराग्याने लग्न केले. त्या बिचाऱ्याचे ब्रह्मचर्य गेले. पुन्हा तो संसारात गुंतला." त्या वैराग्याच्या उदाहरणाने संत तुकडोजींनी पटवून दिले की वैराग्य प्राप्तीसाठी, फार मोठा त्याग करावा लागतो. त्यापेक्षा गावाची सेवा करा. म्हणजेच देवाची सेवा करा. त्यागातच खरे वैराग्य आहे. “ऐसा सन्यास सर्वांनी घ्यावा। आधी आपुला प्रपंच सावरावा। मुरलिया फळापरी सुकवावा। समाज मग।" हे पाहिल्यावर आपल्याला समर्थ रामदासांचे स्मरण होते. “आधी प्रपंच करावा नेटका। मग घ्यावे, परमार्थविवेका॥" आपण काम केल्याशिवाय फुकटच अन्न खाऊ नये. आपल्या स्वत:च्या मुलांप्रमाणेच इतर सर्व मुले मानून त्यांच्या जोपासनेचे व्रत घ्यावे. परमार्थाच्या नावासाठी प्रपंच सोडू नका. आपल्या बायका-मुलांचा त्याग करू नका. भक्तीमध्ये दंग व्हा. रंगून जा. परोपकार करा. वैराग्य वाढवा. हाच तुकडोजींनी राजमार्ग सांगितला आहे. संत तुकडोजींनी गृहस्थाश्रमाची थोरवी अतिशय चांगल्या प्रकारांनी मांडली आहे. ते म्हणतात - 'गृहस्थाश्रमातच समाजाचे सर्वांचे आगत स्वागत आणि भरण-पोषण करता येते. एरव्ही ते शक्य होत नाही. गृहस्थी बनूनही उत्तम परोपकार करता (६९) - ---