पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/71

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

येतो. समाजहित साधते. गृहस्थी हा तनमनाने कष्ट उपसतो तर । संन्यासी सन्मार्गदर्शन करतो. यासाठी अहंकार, हीनतेची भावना विसर्जित करा. परस्परांचा आदर करा आणि वाढवा. धन । कष्टाने वाढवावे आणि ते सत्कारणी लावावे. अशा नेटक्या प्रपंचातच परमार्थ साधतो.' असा प्रपंच परमार्थाचा समन्वय . समर्थ रामदासांप्रमाणेच तुकडोजी महाराजांनी 'ग्रामधर्म' म्हणून सांगितला आहे. उजळा ग्रामोन्नतीचा दिवा : “जन्मोनिया नाही। साधिले स्वहित। तयाचे जीवित। माती मोल।। कासया जन्मला। आला तैसा गेला। - वाया कष्टविला। निजदेह। सुखासाठी केला। संसाराचा धंदा . भोगिली आपदा। नानापरी स्वामी म्हणे त्यासी। कैसे समाधान। अंती नागवण। सर्वस्वीची।। येथे स्वामी स्वरूपानंदानी मनुष्य जन्माचे सार्थक कशात आहे. हे सांगितले. असेच आपल्या जीवनाचे सार्थक, हा भाव लक्षात घेऊन, संत तुकडोजींनी करून घेतले आहे. संत तुकारामांची उक्ती पहा. __ 'धन मिळवोनी कोटी। सवे न येरे लंगोटी। पाने खाशील उदंड। अंती जाशी सुकल्या तोंड। (७०)