पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/72

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

11. पलंग न्याहल्या, सुपती। शेवटी गोवऱ्या सांगाती। यातले मर्म जाणून या राष्ट्रसंताने आपले जीवन यशस्वी केले. मानवताधर्म त्यांनी अवलंबिला. सत्य, प्रेम, शांतीसेवा, त्याग, सदाचरण ही सर्व नैतिकमूल्ये सर्वधर्मांतून त्यांनी वेचली. त्यांचा संदेश 'हम सब एक है।' आम्ही सर्व एक आहोत' असाच आहे. समाजातील सर्वच घटकांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले. माणसा माणसातला विश्वास आणि आत्मविश्वास त्यांनी जागविला. माणसातील सामर्थ्याची त्यांनी जाणीव करून दिली; माणसाचे आत्मबळ वाढविणारी शिकवण दिली. व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. सद्सद् विवेक बुद्धीवर आधारित गुरुदेव चळवळ, खेड्यापाड्यात पोहचविली. प्रबोधनासाठी ग्रामपातळीवर ग्रंथालये उभारण्याचा त्यांचा संकल्प होता. जात, प्रांत, वंश भेदाभेद विरहित सर्वधर्म समभावाच्या सूत्रांचा अवलंब त्यांनी भारतीय जनतेला, करण्यासाठी प्रवृत्त केले. 'देवाघरी एकचि प्राणी। ना श्रीमंत, ना भिकारी कोणी। हा निसर्गदत्त सिद्धांत आहे. पण माणसातील षड्रिपू जागे। 'अनाठायी' होतात. आणि त्यातून मतभेदाचा अनर्थ घडून येतो. समाजरचना स्थिर राहावी, प्रत्येकांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात आणि सर्वांना आपापल्या पात्रतेनुसार आणि कुवतीनुसार रोजीरोटी मिळावी ही त्यांची तळमळ होती. तुकडोजींचा भांडवलशाही, सरंजामशाही, जमीनदारी पोषणकर्ते यांना तीव्र विरोध होता. त्याचा ठिकठिकाणी त्यांनी निषेध केला आहे. श्रमिक वर्गाचे शोषण आणि स्वार्थी वृत्तीचे (७१)