पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/73

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बोकाळणे त्यांना संमत नाही. वस्तुत: “कामे सर्वचि मूल्यवान। त्यांची योग्यता समसमान" हा विचार संत तुकडोजींनी ग्रामगीतेत मांडला आणि 'श्रम' हेच खरे भांडवल आहे असे म्हटले आहे. त्यांनी श्रीमंतांचे धन ही गावची संपत्ती मानली. आपल्याजवळ अधिक असल्यास, ते गावाला पुरवावे. गरिबांचे रक्तशोषण म्हणजे आपले धन, हे श्रीमंतांनी लक्षात घ्यावे आणि श्रीमंतांनी गरिबांचे श्रम ही गावची दौलत आहे हे लक्षात घ्यावे. परस्परांवर विश्वास ठेवून देवाण घेवाण करावी यास्तव त्याग आणि सहानुभूतीची गरज आहे. उत्तम व्यवहारे धन घ्यावे। उत्तम कार्यासाठी लाववीत जावे। जेणे परस्परांचे कल्याण व्हावे। तैसेचि करावे व्यवहार।। सामाजिक बांधिलकी मानून समाजपरिवर्तन घडवावे. चैन विलास सोडावे, असे ते म्हणतात. "दुनिया आहे कष्टिकांची। जो जो कसेल शेती त्याची जो काम करील लक्ष्मी त्याची। दासी व्हावी नियमाने।" विद्वानाने, शिक्षिताने। महंताने, श्रीमंताने। कष्ट काया मुद्दाम लागणे। हेचि मोठेपणाचे।। तुकडोजी महाराज कळवळून लोकांना जागवून समरसता बंधुभावाचा मोलाचा संदेश देतात. गावागावासि जागवा। भेदभाव हा समूळ मिटवा। उजळा ग्रामोन्नतीचा दिवा। तुकड्या म्हणे।। 'श्रम' हा जीवनाचा मूलाधार आहे. श्रम ही देहातील संपत्ती (७२) - -.--.....----