पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/74

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

निसर्गाने दिलेली आहे. ... 'निषिद्ध आणि सकाम कर्म। तैसेचि त्यागुनि अहं-मम। जगासाठी करावेत श्रम। तेचि खरे कर्म। सगळ्यांना जरी कर्म करावे लागत असले, तो निसर्ग नियम असला तरी माणसाकडून असे जगासाठी कर्म अपेक्षित आहे. टोपलंभर शब्दांपेक्षा मूठभर कृती श्रेष्ठ आहे. मातृभूमीला सुखी करा. भरपूर उत्पादन करा. गावाचे धन वाढवा. जनता जनार्दनाची सेवा प्रघात आहे, तेच खरे कर्म. ... गावची आहे तीर्थ : आपल्या देशात खूप काम व्हावयाचे अद्यापही बाकी आहे. दारिद्र्य दुःखावर मात करायची आहे. अर्धपोटी, अर्धनग्न लोकांना अंगभर कपडा आणि पोटभर अन्न द्यायचे आहे. अज्ञानाचा अंध:कार आणि मुक्तसंचार समाजातून नाहिसा करावयाचा आहे. म्हणून संत तुकडोजी म्हणतात - "म्हणोनि सर्वांनी काम करावे। ग्रामाचे धन वाढवावे येथे गरीब, श्रीमंत न पाहावे। कामासाठी-" _ “उद्योगाचा चालला सपाटा। ऐसे व्हावे" मजुरांनी आपली कर्मनिष्ठा जपावी, तर श्रीमंतांनी आळशी बनू नये. तरच आपल्या समाजाची उन्नती होईल. यासाठी "श्रमनिष्ठेचा करावा प्रचार। सर्वासि आपुलकी वाटे पुरेपूर। ऐसी व्यवस्था करावी सुंदर। गावचे उत्पादन वाढवूनी।। (७३)