पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/75

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- - - PEwomantimenaT ONEHENNISTENERATE ommomewoHAHAHKAMVAmsiwan m Em ग्रामोद्योग करावे. जोडधंदे करावे. कलावंतांना उत्तेजन मिळेल अशा कलाकुसरीच्या वस्तू कराव्यात. ऐसी असावी कलाकुसरी। उद्योगधंदे घरोघरी जराही न दिसेल बेकारी। वाढली कोठे।। यासाठी प्रत्येक घटक सज्ञान। पाहिजे निरोगी, उद्योगी, संपन्न। तरीच ते गाव आदर्शाचे भूषण। मिरवू शके. ऐसी करावी ग्रामसेवा। हेचि कर्म आवडे देवा। संशय काही मनी न धरावा। तुकड्या म्हणे।। 'स्वत: जगा आणि इतरांनाही जगू द्या। हा त्यांचा विश्वसंदेश आहे. भूमी दानातून धनदान, विद्यादान, जीवनदान, ग्रामदान या संकल्पना पुढे येऊन हे दान देण्याचे आवाहन राष्ट्रसंतांनी जनतेला केले. 'पुकार भूमिदान की, यह देश की किसान की। सुजान की अनजान की, यह हवा है तुफान की।' 'यवतमाळ जिल्ह्यात त्यांनी सुरु केलेल्या भूदान चळवळीत केवळ अल्पावधीत ११४१० एकर जमीन त्यांनी भूमिदानात मिळवून दिली. तुकडोजी महाराजांनी विविध क्षेत्रातले मननीय विचार मांडले, त्यात महिलांच्या उन्नतीचा विचार महत्त्वाचा आहे. ग्रामगीतेच्या २० व्या अध्यायात महिला उन्नती विषय आला आहे. स्त्रियांनी महापुरुषांना, लढवैय्यांना, थोरसंतांना जन्म दिले. स्त्रियांवर समाजाकडून होणारे विविध प्रकारचे अन्याय त्यांना Imm m mmmmmmmmmwariwww.inwwwcommmmmmmmmmwww (७४)