पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/76

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मान्यच नव्हते. स्त्रियांचा त्याग त्यांना ना मंजूर आहे. ते म्हणतात. . काय स्त्रियांनी युद्ध नाही केले? पति, पुत्रांनाही प्रोत्साहन दिले. स्त्रियांनी आपल्या ब्रीदासाठी प्राणार्पण केले आहेत. जर स्त्रियांची हेळसांड झाली, तर राष्ट्राची अवनती होते. स्त्री शिक्षणाची आवश्यकता त्यांनी सांगितली त्याचबरोबर महिलांचे संघटन आवश्यक असले पाहिजे. हे स्पष्ट शब्दांत मांडले पुढे माता, शिशुसंगोपन, महिला, बाल कल्याण विचार त्यातूनच समाजात रुजला. आज महिलांच्या संघटना ठिकठिकाणी आढळतात. स्त्रीशक्ती जागी झाली आहे. कायद्यानेही त्या महिलांना संरक्षण दिले आहे. निसर्गातील वैचित्र्य आणि वैविध्य यातील सौंदर्य टिपावे त्यापासून धडे गिरवावेत. समाजातील दुःख वेचावे तरच व्यक्तीचा जन्म सार्थ होऊ शकेल. 'गावाकडे चला' खेड्याकडे चला' असे महात्मा गांधींप्रमाणेच त्यांचे सर्व बुध्दिवंत, गुणीजनांना आवाहन आहे. महिलांप्रमाणेच बालकांचा सर्वांगीण विकास व्हावा कारण उद्याचे राष्ट्र घडविणे त्यांच्याच हाती आहे. तिच मुले, खरे उद्याचे राष्ट्र घडविणारे शिल्पकार आहेत. या कोवळ्या कळ्या माजी। लपले ज्ञानेश्वर, रवींद्र, शिवाजी। मुलांमध्ये असलेल्या सामर्थ्याची जाणीव त्यांनी वेळच्या वेळी करुन दिली. यावरून तुकडोजींचे विचार कसे सर्वस्पर्शी होते ते दिसून येते. 'गावची आहे तीर्थ,"कशाला काशी जातो रे बाबा' (७५)