पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/79

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लेखकाचा परिचय डॉ. भास्कर गिरधारी यांचे सध्या पुणे येथे वास्तव्य आहे. त्यांनी विविध महाविद्यालयात मराठीचे प्रदीर्घकाळ अध्यापन केले. प्राचार्य म्हणून २१ वर्षे सेवापूर्ती. बी.ए., एम.ए.विद्यापीठात प्रथम श्रेणीत सर्व द्वितीय क्रमांक प्राप्त. . शासनाची दक्षिणा फेलोशिप प्राप्त. त्यांनी “महाभारतावर आधारित मराठी ललित साहित्य" या विषयावर पुणे विद्यापीठाची पीएच.डी. पदवी संपादन केली. विद्यार्थीदशेत अनेक नामवंतांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. ते पीएच.डी.चे मार्गदर्शक असून त्यांचे २३ विद्यार्थी पीएच.डी. व १४ विद्यार्थी एम.फील. झाले आहेत. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठे, आणि शासकीय, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक संस्थांत त्यांनी विविध महत्त्वाच्या पदावरील जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. त्यांनी आपल्या लेखनात सातत्य ठेवले असून, त्यांचे १२ ग्रंथ, ५ संपादने प्रकाशित आहेत. आजवर २५ पुस्तकांना प्रस्तावना दिलेल्या आहेत. २० ग्रंथात त्यांचे लेख समाविष्ट आहेत. विविध विषयावरील एक अभ्यासू, प्रभावी वक्ते, प्रवचनकार म्हणून उभ्या महाराष्ट्राला ते परिचित आहेत. आतापर्यंत २१ महनीय पुरस्काराने ते सन्मानित झाले आहेत. वाचन, लेखन, समाजसेवा, व्याख्याने, प्रवचने या त्यांच्या आवडीच्या कार्यक्षेत्रात ते नेहमीच सक्रीय आहेत. संपर्क पत्ता : “ए विंग ४०१ सदनिका, शुक्रतारा संकुल, सिंहगड पथ, पुणे ४११०३०. चलभाष : ९८२३०१२३०१, E-mail : bvgirdhari@gmail.com • website : www.bvgirdhari.com Suvidha-9326575775