पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/9

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बनतील आणि आमची ही भारत देश स्वतंत्र करण्याची नाव किनाऱ्याला लागेल. त्यांच्या जीवापाड आवडीच्या, धुंद होऊन वाजविलेल्या खंजिरीतून असे हे विचार निनादत होते. भारतातील थोर व्यक्तींनी महात्मा गांधी, पंडित मालवीय, डॉ. राजेंद्र प्रसाद, आचार्य विनोबा भावे, जयप्रकाश नारायण, सानेगुरुजी या महान व्यक्तींनी, संत तुकडोजी महाराजांनी जनसमुदायात वाटलेल्या या विचारधनाबद्दल, मुक्तकंठाने गौरव केला आहे. यामध्ये संत तुकडोजी यांच्या व्यक्तिमत्वाचे मोठेपण स्पष्ट होते. . . . केले मनन सर्वकाळ : राष्ट्रसंत तुकडोजींची प्रतिभा त्यांच्या या सुविचारांनीच जन सामान्यांच्या अंत:करणात अत्यादराने कोरली गेली होती. आजदेखील विशाल जनसमूहाच्या मनात संत तुकडोजी महाराजांना अत्यादराचे स्थान आहे. त्यांचे विचार, आचार, उच्चार सारेच उदात्त होते. आपल्या आत्मनिवेदनात त्यांनी म्हटले आहे. 'काही योगाचे साधन। थोडे अध्यात्मवाचन। विशेष विश्व निरीक्षण। केले मनन सर्वकाळ। या उद्गारात संत तुकडोजींच्या जीवनाचे सगळे रहस्य सामावलेले आहे. अखिल मानवजातीचे कल्याण व्हावे यासाठीच संत तुकडोजींनी आपले जीवनसर्वस्व ईश्वरसेवेत,