रूपा : मला चहा घ्यायचाय. मॉम 5
लता : (हातातलं काम सोडून) देते बाई
बापू : काही नको. ही काय चहाची वेळ आहे का ?
रूपा : मग, चहाची वेळ कोणतीय ?
बापू : रूपा वाद नको घालूस. मी सकाळपासून तुझी वाट पाहतोय.
रूपा : आणि मी आलेच नसते तर... मॉम, चहा ऽ ऽ
(लता आत निघते, तिला थांबवत )
बापू :हे बघ रूपा, पटकन पूजा करू की मग चहाच काय,
नाश्ताही करू ?
रूपा : मला नाही वेळ. मी निघालीय.
लता : अगं चहा करते घेऊन जा ना.
रूपा : (गडबड करत) ए जाऊ दे आता. मी पळते.
बापू :( तिला थांबवत ) तुला तसं जाता येणार नाही.
रूपा : ( गमतीनं) मग कसं जाता येईल ?
बापू : (अस्वस्थ ) गमतीची वेळ नाही.
रूपा : हो ना. मला गडबड आहे.
बापू : अगं पण पूजा---
रूपा : ती तू घे करून !
बापू : पण ही घरातल्या बायकांनी करायची पूजा आहे.
रूपा : ओ ऽ शिट 5 काय रे तुझं हे. मला नाही वेळ.
बापू : (तिला अडवत ) थांब रूपा. मी सांगतोय ना तुला
रूपा : ए चल,मी पळते.
बापू : रूपा बेटा, अग मुलीच्या हातून पूजा व्हावी म्हणून
रूपा : बॅप्स ! जस्ट किप क्वायेट ! ओ के ?
बापू : रूपा ?
रूपा :येस. उगाच अडवू नको. राघू माझी वाट पाहतोय.
बापू :मी सकाळपासून तुझी वाट पाहत होतो.
रूपा :मी काय करू मग ?
बापू : अगं असं काय करतेस...
रूपा : चल निघते.
रुपक । २० ।
पान:रुपक.pdf/२०
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे