या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



रूपा  : मॉम ऽ ऽ ! नुसतं नाव नाही, राघू नावाचा तो तरूणही गोड आहे
 नावासारखा.
बापू : राघू म्हणजे राघव. राघव हे श्रीरामाचं नाव आहे.
लता : आम्ही पोपटाला रात्रू म्हणायचो.
रूपा  : तुम्ही जे म्हणताय ते सगळं राघूमध्ये आहे. तो हॅण्डसम आहे,
 रूबाबदार आहे. त्याची 'ओरीटोरी' अफलातून आहे. एका मिनिटात
 समोरच्या माणसावर छाप पाडतो तो.
लता  : ते त्याचं कौशल्य तू न सांगताच कळलंय आम्हाला.
रूपा  : हे गं काय मॉम ? तो खूप हुशार आहे. कोणत्याही परिस्थितीचा
 फायदा कसा घ्यायचा हे बरोबर समजतं त्याला. सगळे बॉस
 त्याच्यावर खूष आहेत.
बापू  : आणि रूपा बॉसही फिदा आहेत, एम आय राईट ?
रूपा  : ॲब्स्यल्यूटली! तुम्ही त्याला पाहाल, त्याच्याशी बोलाल तर
 तुम्हीही प्रेमात पडाल त्याच्या.
लता  : रूपाचा चॉईस काय आलतू फालतू नसणार !
रूपा  : प्रश्नच नाही. सगळ्या गोष्टीवर कमांड आहे त्याची आणि कविता
 तर काय करतो ! इंग्रजीमधून. आमच्या भेटी वाढल्या तर त्यानं
 एक सुंदर कविता मला गिफ्ट दिली.
बापू  : व्वा. आहे का तुझ्याजवळ !
रूपा  : जवळ ? मला पाठ आहे ती. चालीत म्हणते

 If you call me, I will come
 Swifter, O my Love,
 Than a trembling forest deer
 Or a panting dove,
 Swifter than a snake that files
 To the charmer's thrall...
 If you call me I will come
 Fearless What befall.

रुपक । २८ ।