या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[ १२३ ]

 सुवर्णसंलमचलनाचे जे कट्टे भक्त आहेत त्यांचं ह्मणणे असे आहे की सोन्याचा निधि हा विशेषतः संकटकाळी आंतरराष्ट्रीय देणं देण्याकरितां ठेवण्याचा असतो; यामुळे तो केंद्रीभूत असलेला चांगला व ज्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय देणें सहज देता येईल अशा ठिकाणी तो असावा. असे ठिकाण ह्मणजे अर्थात् लंडन हेंच होय. शिवाय हिंदुस्थान हा साम्राज्याचा घटक असल्यामुळे लंडन हैं परकीय नसून साम्राज्याचीच राजधानी आहे.'यूव वयं वयं यूयं अशी भावना असावी.हिंदुस्थानांतच निधि असावा ही इच्छा फक्त मनोविकागने प्रेरित झालेली असून हिच्यांत विचारशक्तीचा गंधही नाहीं. हे सर्व ठीक आहे. यावर उत्तर एकच आहे; ते असे की, आमच्या निधीचा फायदा आमच्या व्यापागस होणे हेच युक्तिवादास धरून आहे. १९१२ च्या मार्चमध्ये वरिष्ठ कौन्सिलांत सर विठ्ठलदास थाकरसी यांनी सुवर्णचलननिधि हिंदुस्थानांत असावा अशा अर्थाचा ठराव पुढे आणला व सर्व हिंदुस्थानी सभासदांनी त्याला अनुकूल मत दिले. परंतु अखेरीस ३३ विरुद्ध २४ अशी मते पडून हा ठराव रद्द झाला.
 १९०८ मध्ये नामदार गोखले यांनी कौन्सिलांत भाषण केले त्यांत ते ह्मणाले " या सर्व घोटाळ्यांतून बाहेर पडण्यास एकच मार्ग आहे. तो असा- युनायटेड स्टेट्स व फ्रान्स प्रमाणे रुपये हे वाटेल त्या प्रमाणांत कायदेशीर फेडीचे चलन समजावें, परंतु