या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १५८ )

 तुलनात्मक पद्धतीमध्ये सोन्यारुप्याची नाणी तोलून कस लावून मूळ धातूच्या भावानेच स्वीकारली जातात. अंतर्राष्ट्रीय व्यापा- रांत ही पद्धति चालू असते. एकात्मकचलनपद्धतीमध्ये एकाच धातूचे नाणे पाडले जाते व ते कायदेशीर फेडीचे चलन असते. यांत दोष असा आहे की, नाणे एकच असल्यामुळे मोठ्या व्यापारास लहान पडते किंवा किरकोळ व्यापार स मोठे होते त्यामुळे दोन्ही वेळां गैरसोय होते. संमिश्रचलन पद्धतीत एका धातूचे नाणें काय देशीर फेडीचं मुख्य चलन असते. (हे बहुधा सोन्याचंच असतं ाणून आह्मी या पद्धतीस सुवर्णेकचलनपद्धतीशीं अन्वर्धक अस घरले आहे.) यांचेबरोबरच दुसन्या धातूचे रुपे, तांबे, ब्राँझ इत्यादि नाणें उपपैसा ह्मणून चालते. मुख्य पैशाचे चलन अमर्यादि प्रमाणांत असते व उपपैशाचे चलन ठराविक प्रमाणांत असते. बहुतेक पाश्चात्य देशांत हीच पद्धति हल्ली रूट आहे.द्विचन- पद्धतीसंबंधी वर वर्णन केलेच आहे. लंगड्या द्विचलनपद्धतीमध्यें मात्र दोन्हीं धातूंची ( अर्थात् सोनें, रुपे ) नाणी पाडली जातात वती कायदेशीर फेडींचे चलन समजली जातात; परंतु शुद्धं- द्विचलनपद्धतीप्रमाणे दोनही नाणीं टांकसाळींतून पाडून मिळत नाहीत. फक्त एकाच धातूची नाणी पाडून मिळतात. सर- कारला मात्र दोनही धातूंची नाणी पाडतां येतात.
 आतां इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका वगैरे सुधारलेल्या देशांतील चलनांचा थोडक्यांत विचार करून मग हिंदुस्थानांतील चलनाकडे दळ सणजे तुलनेने दोन्हींमधील मेद लक्षांत येण्यास ठीक पडेल.