या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १८८ )

लंडनमध्ये पुनः कटमिति देऊन तेथील बँकांस विकतात. वर सांगितल्याप्रमाणें ( हिंदुस्थानचा निर्यात व्यापार आयात व्यापारा- पेक्षा मोठा असल्याकारणाने) लंडनच्या बाजारावर काढलेल्या हिंदुस्थानांतील मुदतीच्या हुंड्यांची संख्या नेहमीच जास्त असते. त्यामुळे ह्या मुदतीच्या हुंड्या एक्सचेंज बँका आपल्या हिंदुस्थानांतील ऑफिसांमार्फत खरेदी करीत असतात व त्यांच् लची रकम मुदत पूर्ण झाल्यावर ( अगर मुदतीच्या अगोदर वठ- विल्यास व्याज कमी होऊन ) त्यांच्या लंडनच्या ऑफिसांत जमा होत असत. तेव्हां या बँकांच्या लंडनच्या शाखांत जरी पैसा भरपूर जमत असला, तरी नवीन अधिक हुंड्या हिंदुस्थानांत खरेदी करण्याकरितांही इकडील शाखांस पैशांची सारखी जरूरी असते. तेव्हां ही पैशाची उणीव भरून काढण्याकरितां, या बँका (कौन्सिल ट्रॅफ्ट्स) सरकारी हुंड्या लंडनमध्ये विकत घेऊन, हिंदुस्थान सरकारचे खजिन्यावर त्यांचे पैसे घेतात; किंवा बँक ऑफ इंग्लंडकडून अथवा इजिप्शियन अगर ऑस्ट्रेलियन बँ- कांच्या एजंटामार्फत पौंड घेऊन ते हिंदुस्थानांतील आपल्या शाखांकडे पाठवितात. शिवाय कौन्सिल बिलांच्या टी.टी च्या द्वारे पैसे इकडे ताबडतोच मिळण्याची सोय झालेली आहे. तेव्हां ते पुनः येथील शाखांतून नवीन खरेदी करण्याकरितां उप- योगांत आणिले जातात. यावरून असे दिसून येईल कीं, खाजगी हुंड्या किंवा एक्सपोर्ट बिलें यास जी मागणी असते, ती