या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १९४ )

अलक्झेंडर कंपनीच्या बरोबरच नाश पावली. 'कमर्शियल बँक ' लणून एक बँक १८१९मध्ये स्थापिली गेली व तिचाही अंत १८६३- मध्येच झाला. बंगाल प्रांतांत विशेषत कलकत्याच्या आसपास या कालीं बँकांच्या पिकास विशेष जोर आग होता नीळ , ताग यांची लागवड व व्यापार करणाऱ्या बऱ्याच युरोपिअन कंपन्या या वेळी येथें होत्या. त्यांनीच ' बँक' या नांवाखाली बऱ्याच लोकांस फसविलें. बनारस बँकेचे (१८४५) ह्स्तक कॅ प्टन फॅगन, डॉ० वटर; मि० वॅर्थर्स्ट [ मिर्झापूर बँकचे उत्पादक ] अशा प्रकारच्या बन्याच हुपार लोकांनी बँका स्थापन करून अखे- रीस लोकांचे पैसे आपल्या खिशांत लांबविले. हिंदुस्थानचे व्या पारी, अशा प्रकारचे प्रथम ग्रांसी मक्षिकापात फार झाल्यानेच, बँकांकडे साशंकतेने पाहू लागले हेंही येथे लक्षांत ठेवण्यासारखें आहे. चार दोन व्यापायांनी बँकेच्या नांवावर पैसा गडप करण्या- पेक्षां, तो ' अनुत्पादक' स्थितींत पडलेला काय वाईट असे वाटणें साहजिकच आहे. अशा प्रकारच्या वाईट उदाहरणामुळेच इंग्लिश बँकांवरचा विश्वास उडाला तर त्यांत नवल काय ! तरी पण हिंदुस्थान ही एक मूल्यवान् धातु गडप करण. रा खड्डा आहे अशा प्रकारची जी एक ओरड वेळी अवेळी हिंदुस्थानच्या हितशत्रूं - कडून करण्यांत येते, त्यांनी इतर कारणांबरोबरच वरील कारणां- चाही विचार केल्यास बरें होईल, असो.