या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २३९ )

ल्याबरोबर हा देश गरीब होतो. या दोहोंची संगति लावणं क- ठीण आहे. ज्या देशांत दरसाल सर्व देणें देऊनही ३०/३५ कोटि रुपयांचें सोनें खेतें त्या देशांत सुवर्णचलन होणे हे अगदी नैसर्गिक च युक्त आहे.
 सुवर्णचलनावर दुसरा आक्षेप असा आहे कीं, ह्या चलनामुळे हिंदुस्थानांत सोजें फार येऊन, इतर देशांत सोन्याची टंचाई पडून सर्वत्र अस्थिरता उत्पन्न होईल. हल्लीं सोन्याचे चलन नाहीं तरीही फक्त दागिने चगैरेकरितां अदमासें २५/३० कोटींचें सोनें दरवर्षी हिंदुस्थानांत येतें. सोन्याच्या चलनाकरितां दरसाल आणखी ४०/५० कोटींचें सोनें येऊं लागल्यास, इतर देशांत सोनें महाग होऊन, तेथील बँकिंगचा आधार कमकुवत होईल व पत्तीची सर्व इमारत डळमळू लागेल. या आक्षेपावर पहिले उत्तर हे आहे की सर्व जगांतील व्यवहाराचा विचार हिंदुस्थानास कर्तव्य नाही. जर्मनीने १८७१ मध्ये सुवर्णचलन सुरू केले त्यावेळेस त्याने सर्व जगाचा विचार केला होता काय ? उत्तम चलनपद्धति जी असेल ती स्वीकारण्याचा प्रत्येक देशाचा हक्क आहे. त्यापासून इतर देशांस अपाय झाल्यास तो अपरिहार्य आहे.
 परंतु वस्तुस्थिति अशी नाहीं. सोन्याचे उत्पादन दरसाल अधिक अधिक वाढत चालले आहे. १८९० साली जगांत एकंदर ३६ कोटींचें सोनें पैदा झाले. १८९६ साली ४८ कोटींचें सोनें पैदा झाले. १८९९ साली ९२ कोटींचें सोनें पैदा झालें.