या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केसरी-निरोगी स्थितीत पचनक्रिया कशी असते, शरीरांतील निरनिराळ्या इंद्रियांचे उपयोग व क्रिया कशा चालतात, कोणतें खाद्यपेय कसें व केव्हां ग्रहण करावें, अग्निमांद्य कशानें होतें, अग्निमांद्याची लक्षणे कोणतीं, अन्नावर अन्न खात गेल्याने अन्न फस्त होऊन, होऊन शिवाय तें शरीरास कसें अपाय करतें, अन्न नीट चावून कां खाल्लं पाहिजे, उत्तेजक पेयांपासून होणारी हानि, निद्रेचे महत्त्व, मलावरोध कां होतो, पाणी जास्त प्याल्याने पचनक्रियेस कसा अडथळा होतो, ताकाचा उपयोग किती आहे, रेचके कशी व केव्हां घ्यावी, अग्निमांद्य होऊं नये ह्मणून काळजी कशी घ्यावयाची व तें झालेच तर त्यावर उपाय काय करावा, वगैरे गोष्टींचे शास्त्रशुद्ध विवेचन या पुस्तकांत केले असून पुस्तक एकंदरीने वाचनीय, मननीय व संग्राह्य झालेले आहे. - इंदुप्रकाश-प्रत्येकाने हे पुस्तक अवश्य वाचावें व प्रत्येक कुटुंबिकानें संग्रही ठेवावें. सयाजीविजय-ज्यांना डिस्पेप्सिआ झाला असेल त्यालाच या पुस्तकाचे महत्त्व आहे असे नसून प्रत्येकाला आपली रोजची दिनचर्या कशी राखावी, कसे वागले झणजे आपले आरोग्य उत्तम राहील ह्यासंबंधी पुष्कळ गोष्टी हे पुस्तक वाचल्याने कळून येतील. जगवृत्त-ज्यास ह्या रोगापासून दूर राहून सशक्त व दीर्घायु व्हावयाचे असेल त्याने हे पुस्तक पुनः पुनः वाचून त्यांतील उपयुक्त सूचनांचा योग्य फायदा घेण्याचा प्रयत्न अवश्य करावा. सुबोधपत्रिका-आपली प्रकृति निकोप राहाण्याची अत्यंत आवश्यकता आहे असे ज्यांस वाटत आहे त्या सर्वांनी हे लहानसें पुस्तक एकवार वाचावें. ज्ञानप्रकाश-या विषयावर मराठी भाषेमध्ये एखादें पुस्तक असण्याची जरूरी होती, ती उणीव डॉ० काळोखे यांनी भरून काढली आहे. किंमत ८ आणे. पत्ता-डॉ० गणपत पांडुरंग काळोखे, ए. ए. एम्. एस्., चर्नीरोड, गिरगांव, मुंबई.