या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रोगजंतू. रोग झाला असता त्याचा उपशम करणे हे जितकें महत्त्वाचे आहे तितकेंच किंवा त्याहून अधिक महत्त्वाचे रोग होऊ नये अशी तजवीज करणे म्हणजे रोगाचा प्रतिबंध करणे हे आहे. रोगाचा प्रतिबंध करण्याचे जे अनेक उपाय आहेत, त्यांपैकी आरोग्यशास्त्राचे नियम व रोगोत्पत्तीची कारणे ह्या संबंधाने साधारण जनसमूहास माहिती करून देणे हा एक श्रेष्ठ उपाय आहे. इंग्लंडांत अशा विषयांवर मोठमोठ्या भिषग्वरांनी सोप्या भाषेत लिहिलेले असे लहान लहान ग्रंथ पुष्कळच आहेत; व तेथील वर्तमानपत्रांत व मासिकांत अशा विषयांवर लेख वारंवार येतात. आपल्या येथे ह्या महत्त्वाच्या बाबतींत जिकडे तिकडे अज्ञान असल्यामुळे आपल्याकडून अप्रत्यक्षरीतीनें रोगांच्या प्रसारास बरीचशी मदत होते. पश्चिमेकडील देशांत आरोग्यशास्त्रासंबंधी नित्य नवे नवे व चमत्कारिक शोध होत आहेत. नवीन शोध झाल्याबरोबर त्या संबंधानें वर्तमानपत्रांतून व मासिकांतून चर्चा सुरू होते; त्या शोधांत तथ्य किती आहे ह्याची जाणत्या लोकांकडून शहानिशा केली जाते व ह्याप्रमाणे साधारण लोकांस त्या संबंधाने माहिती होते. ममा म्यनिसिपालिट्या व लोकल बोर्डे ह्यांस अधिक हक्क मिळून स्थानिक आरोग्यरक्षणाचे काम हाती घेण्यास आपल्या लोकांस अवसर मिळत आहे. त्यामुळे ज्यांच्या हातांत स्थानिक