या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

खराज्याची सूत्रे आली आहेत त्यांना आरोग्यशास्त्रासंबंधाने ठळक ठळक गोष्टींची माहिती असणे अवश्य झाले आहे. हिवताप (मलेरिआ), प्लेग, वाखा, इत्यादिकांच्या सांथीपासून लोकांचे किती नुकसान होत आहे तें वर्तमानपत्रांवरून सर्वांस अवगतच आहे. अशा स्थितीत शास्त्रीय माहिती सुबोध भाषेत लिहून साधारण जनसमूहास सादर करणे व पाश्चिमात्य देशांत होत असणाऱ्या शोधांची त्यांना ओळख करून देणे अवश्य आहे. घरांतील व्यवस्था साधारणतः स्त्रियांच्या हाती असल्यामुळे त्यांना काही विषयांचे सोपपत्तिक ज्ञान असणे अवश्य आहे. स्त्रियांच्या अज्ञानामुळे आरोग्यशास्त्राचे नियम प्रचारांत आणणें दुर्घट झाले आहे. एवढेच नव्हे तर आपल्या सध्यांच्या स्थितीत आरोग्यरक्षणाच्या कामी त्यांच्याकडून हवी तशी मदत न मिळतां उलट अडथळा मात्र होतो. त्यांना एकदां ह्या विषयाची माहिती झाली ह्मणजे आपण होऊनच त्या घरांतील माणसांच्या आरोग्याची तरतूद ठेऊ लागतील. ह्यासाठी अशा विषयावर सोप्या भाषेत लिहिलेल्या पुस्तकांची फारच आवश्यकता आहे. पाश्चात्य वैद्यकशास्त्राचे पाऊल दिवसेंदिवस पुढे पडत चाललें आहे. त्यांत नवे नवे शोध होत आहेत. अशा शोधांपैकी अत्यंत महत्त्वाचा शोध मटला ह्मणजे जंतुशास्त्र (Bacteriology)हा होय. ह्या शास्त्रासंबंधी वाचकवर्गास थोडक्यांत व सुलभ रीतीने माहिती करून देण्याचा आमचा मानस आहे. _जंतूंसंबंधाचा शोध पहिल्याने पाश्चर यांनी लाविला. सन १८४९ सालीं ज्यावेळी फ्रान्सच्या दक्षिण भागांत रेशमाचे किडे एकसारखे