या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आपण पुष्कळदां ऐकले असाल की, प्लेग, हिवताप, खरूज, गजकर्ण, वगैरे रोग एका प्रकारच्या जंतूंनी होतात. पण हे जंतू कोठे असतात, शरीरांत कसे शिरतात व रोगोत्पत्ति कशी करतात, वगैरे संबंधी माहिती फारच थोड्यांनां असेल. ह्या जंतुशास्त्राच्या शोधामुळे रोगांच्या कारणांच्या बाबतींत वैद्यशास्त्रामध्ये बरीच मोठी क्रांति झाली आहे. मागें ज्या रोगांचे कारण सांगतां येत नसे, किंवा जे रोग अमुक कारणांनी उत्पन्न होतात असे. साधारण धोरणाने मानण्यात येत असे, त्या बहुतेकांची खरी कारणे निरनिराळ्या प्रकारचे जंतू होत, असें आतां ठरले आहे. हे जंतू सूक्ष्मदर्शकयंत्राचे साहाय्यावांचून नुसत्या डोळ्यांनी दिसत नसल्यामुळे त्यांस इंग्रजीत Micro-organisms किंवा सूक्ष्म जंतू असें ह्मणतात. वसतिस्थान. __जंतू हे सर्वत्र पसरलेले आहेत. जमीन, हवा, अन्न आणि पाणी यांमध्ये ते भरलेले आहेत. दाट व घाणेरड्या वस्तीच्या ठिकाणीं-उदाहरणार्थ, मुंबईसारख्या शहरांत, जेथे लोकांनां गरीबीमुळे किंवा अन्य कारणांनी लहानशा जागेत कोंडल्याप्रमाणे राहावें लागते अशा ठिकाणी, हे फारच असतात. घरांतील जमिनीवर, कोनाड्यांत किंवा इतर ठिकाणी, अर्धवट खाऊन टाकलेलीं बिस्किटें, पाव, भाकर, वगैरे पदार्थांचे तुकडे, फळांच्या साली, केरकचरा, १ आर्यवैद्यकांत जंतूसंबंधाने लिहितांना म्हटले आहे, "सूक्ष्मत्वाचैके भवन्त्यदृश्याः" कित्येक जंतू इतके सूक्ष्म असतात की, ते नुसत्या डोळ्यांनी दिसत नाहीत. (चरकसंहिता-विमानस्थान ).