या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मलमूत्र वगैरे पदार्थ काही वेळ राहिल्याने ते सडण्याची क्रिया या जंतूंमुळेच होते. जेथे जेथें वनस्पति आणि प्राणी उत्पन्न होतात व लयास जातात तेथे तेथे हे जंतू असतातच. उंच वातावरणामध्ये व बर्फयुक्त पर्वतांच्या उंच शिखरांवर, तसेंच महासागराच्या मध्यभागी हे फारच कमी किंबहुना नसतातच, असें ह्मणतात. खेडेगांवीं लोकवस्ती तुरळक असल्यामुळे शहराच्या मानाने हे बरेच कमी असतात, यांत संशय नाही. इस्पितळामध्ये रोग्यांची फार गर्दी झाल्यास तेथे हे विशेष आढळण्यांत येतात. आपल्या शरीराच्या पृष्ठभागावर, नखांच्या खाली, कानाच्या भोंकांत, नाक, डोळे, तोंड, आंतडी, गुहयेद्रिये, वगैरे ठिकाणी; तसेंच घराच्या भिंती, छत, कोनाडे, बरेच दिवस एकाच जागी पडून असलेल्या खुर्व्या, बांकें, टेबलें, कपाटे वगैरे लांकूडसामान, घरांतील जमिनीवर पसरून ठेविलेला काथ्या किंवा गवताच्या चटया, पायपुसणी, काळोखाच्या जागा, भिंतीवरील तसबिरी आणि फळ्यांवर रचून ठेविलेली पुस्तकें यांतून ते बरेच असतात. यावरून मोन्या, गटारें व शौचकूप वगैरे घाणीच्या जागी त्यांची किती गर्दी असते याचे अनुमान सहज होईल. अशा जागा ह्मणजे जणूं काय त्यांची माहेरघरेंच होत. त्यांतल्या त्यांत सांगावयाचे झणजे शहरांपेक्षां खेडेगांवीं, घरांतील जागेपेक्षां घराबाहेरील उघड्या जागेत, अंधार असलेल्या जागेपेक्षा उजेडाच्या व ऊन पडत असलेल्या जागी हे बरेच कमी असतात. एकंदरींत हे आहेत कोठे हे सांगण्यापेक्षां नाहींत कोठे हे सांगणे फार कठीण आहे.