या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जंतूंच्या जाती. वरील विवेचनावरून कोणालाही भय वाटणे साहजिक आहे. कारण अशा प्रकारे जर हे जंतू सर्वत्र पसरून रोग उत्पन्न करूं लागले तर आपले पुढे होणार तरी कसें असें वाढू लागते. पण ईशकृपेनें तसें वाटण्याचे कारण नाही. ह्या जंतूंचा नाश करून किंवा अन्यमार्गानें, त्यांचे अनिष्ट प्रयत्न विफल करण्याची शक्ति परमेश्वरानें अंशतः आपल्या अंगी दिली आहे. ही शक्ति उघड्या हवेंत वावरणाऱ्या व सशक्त मनुष्यांच्या अंगी साधारणतः विशेष प्रमाणानें असते व अशक्त मनुष्यांत कमी प्रमाणाने असते. असो; ज्याप्रमाणे आपल्यामध्ये कांहीं माणसें चांगली असतात व कांहीं वाईट असतात त्याचप्रमाणे या जंतूंमध्येही दोन जाती आहेत. एक चांगली ह्मणजे निरुपद्रवी व दुसरी वाईट ह्मणजे रोगोत्पादक. यांपैकी दुसऱ्या प्रकारचे जंतू, ज्यांच्यामुळे आपल्यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे रोग उत्पन्न होतात, त्यांच्या संबंधाची माहिती प्रथमतः असणे जरूर असल्यामुळे त्यांचाच विचार या पुस्तकांत केला आहे. रोग उत्पन्न करणाऱ्या जंतूंचे मुख्य दोन प्रकार आहेत. १ प्राणिजन्य व २ वनस्पतिजन्य.. प्राणिजन्य प्रकारांत मलेरिआ, खरूज, इत्यादि रोगांचे जंतू येतात. वनस्पतिजन्य प्रकारांत गजकर्ण, प्लेग, वगैरे रोगांचे जंतूं येतात. वनस्पतिजन्य जंतूंपैकी काही विशेष उदाहरणे खाली दिली आहेत.