या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कोकाय:-जंतू गोलाकार (शून्याचे आकृतिप्रमाणे) असले ह्मणजे त्यांना कोकाय असें ह्मणतात. यांच्या एका पिंडापासून दोन निरनिराळे पिंड होतात. (१) ज्यावेळी यांचा आकार द्राक्षांच्या घडाप्रमाणे असतो, त्यावेळी त्यांस स्टॅफिलो आकृति १ ली. कोकाय अथवा क्लस्टर कोकाय असें ह्मणतात. (आ० १ पहा). यांनी निरनिराळे पूयजनक रोग आकृति २ री. उत्पन्न होतात. (२) ज्यावेळी यांचा ... आकार सांखळीप्रमाणे असतो, त्यावेळी त्यांस स्ट्रेप्टोकोकाय किंवा चेनकोकाय हे नांव देतात. (आ० २ पहा). अशा प्रकारच्या जंतूंनी पूतिज्वर (सेप्टिसीमिआ ), विसर्प वगैरे रोग उत्पन्न होतात. (३) ज्यावेळी यांचा आकार दोन दोन मिळून जोडीसारखा दिसतो, त्यावेळी त्यांस डिप्लोकोकाय असें ह्मणतात. आकृति ३ री. असे जोड, जंतू परमा आकृति ४ थी. (आ० ३ पहा ). व ।। न्युमोनिआ (आ० ४ । .. पहा). रोगांमध्ये पाहाग्यांत येतात. आकृति ५ वी. । बॅसिलायः हे कित्येकदां लांब व कित्येकदां तोकडे असतात. अग्रॅक्स, क्षय, पटकी (आ० ५ पहा). रक्तपिती, धनुर्वात, घटसर्प वगैरे रोग या जंतूंनीच होतात.