या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

. आकृति ६ वी. स्पायरिलायः-यांतील जंतू पिरगळ लेले झणजे स्क्रूसारखे असतात. (आ०६ पहा). रिलॅसिंग फीवर या जंतूंनींच होतो. वर दिलेल्या जंतूंमध्ये बऱ्याच पोट/ जाती आहेत. त्या सर्व येथें देऊं गेल्यास त्याचा सामान्य लोकांस फारसा उपयोग होणार नाही. यासाठी मुख्य मुख्य प्रकारांचे वर्णन दिले आहे. म जंतूंची वाढ व आकार. इंद्रियविज्ञानशास्त्रदृष्ट्या या जंतूंची वाढ कशी होते हे पाहूं गेल्यास प्राणी आणि वनस्पति यांच्या वाढीप्रमाणेच ती आहे असे आढळून येते. हे जंतू एकाचे दोन, दोहोंचे चार, याप्रमाणे वृद्धि पावत असतात. एका जंतूपासून एका दिवसांत सुमारे १,६८,००००० जंतू उत्पन्न होतात. तशांत त्यांच्या वाढीस उत्तेजक अशी योग्य परिस्थिति असली ह्मणजे मग पाहावयासच नको. जंतूंचा आकार कमीजास्त प्रमाणाने लहानमोठा असतो. सर्वच सारख्या आकाराचे नसतात. त्यांच्यामध्ये विषमता दिसून येते व त्यामुळे परस्परांपासून ते ओळखता येतात. जर हे जंतू एका रांगेत ठेविले तर ते एक इंच जागेत २०००० किंवा एक इंच चौरस जागेत एका थराने ४००००० या प्रमाणाने राहूं शकतात. यावरून हे किती सूक्ष्म असतात याची कल्पना सहज होते. त्यांचा आकार बरोबर सांगणे कठीण आहे.