या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ग जंतं, खाद्य. in मागील वर्णनावरून त्यांचे खाद्य काय असते, हे निराळे सांगितले पाहिजे असे नाही. परंतु इतकें सांगणे जरूर आहे की, शरीरांतील अनेक ठिकाणी असलेल्या नैसर्गिक अथवा वि. कृत द्रव्यांवर ह्मणजे रक्त, मांस, पू, इत्यादि पदार्थांवर त्यांची उपजीविका होते. मलमूत्रादि विषे. जंतूंची वृद्धि होते, त्यावेळी एक प्रकारचे विष तयार होतें. ही विषे झणजे त्यांचे मलमूत्रच होत असें ह्मणण्यास हरकत नाही. जंतूंमुळे होणा-या विषाला "टॉक्सिन्स" असें ह्मणतात. शरीराला अशा जंतूंपासून अगर त्यांच्यापासून उत्पन्न होणाऱ्या टॉक्सिन्सपासून अथवा दोहोंपासूनही विकार होतो. जंतू ओळखावेत कसे ?* हे ओळखण्याचे निरनिराळे प्रकार आहेत. (१) कृत्रिम पोषक द्रव्यांमध्ये जंतूंची लागवड करून त्यांचे परीक्षण करणे. यासाठी कच्चा बटाट्याचा तुकडा जंतुरहित करून त्यांत त्याची लागवड करितात; दूध, मांसरस, चिनीघास (अगर अगर), जेलटिन, रक्तोदक, वगैरे पदार्थांतही त्यांची वाढ करितात. (२) सूक्ष्मदर्शकयंत्रानें परीक्षण करणे. हे पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकयंत्रे फार मोठ्या शक्तीची असावी लागतात. कित्येकदा असल्या यंत्रांतूनही

  • हे प्रयोग साधारण माणसांस करणे कठीण आहे.