या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जंतूंचा शरीरांत शिरण्याचा मार्ग. जंतू निरनिराळ्या वाटेने शरीरांत जातात. कित्येक जंतू अन्नाबरोबर जातात. उदाहरणार्थ, आंत्रज्वर, कॉलरा, वगैरे. कित्येक श्वासाबरोबर जातात. उदाहरणार्थ, न्यूमॉनिक प्लेग, न्यूमोनिआ, क्षय, वगैरे. कित्येक पिसवा किंवा डांस ह्यांनी दंश केलेल्या भागांतून किंवा अंगावर असलेले व्रण किंवा जखम यांतून जातात. उदाहरणार्थ, उपदंश, ब्यूबॉनिक प्लेग, मलेरिआ, पिसाळलेल्या कुत्र्याचे विष, वगैरे.. रोगप्रतिबंधकशक्ति. ( Immunity.) ही शक्ति कित्येक प्राण्यांमध्ये निसर्गतःच असते. इला नैसर्गिक रोगप्रतिबंधकशक्ति ( Natural immunity ) असें ह्मणतात. अथवा ती कृत्रिम रीतीनेही आणतां येते. तिला कृत्रिम रीतीने आणलेली रोगप्रतिबंधकशक्ति (Artificial immunity ) असें ह्मणतात. कृत्रिम रीतीने आणलेली ही शक्ति बराच काळपर्यंत टिकणारी किंवा थोडा काळ टिकणारी असते. उदा०देवीची लस टोचून आणलेली रोगप्रतिबंधकशक्ति बराच काळ किंबहुना आयुष्यभर टिकते, पण प्लेगची लस टोचून आणलेली रोगप्रतिबंधकशक्ति थोडा काळपर्यंत टिकते. १ कित्येक जंतू प्रत्यक्ष रीतीने शरीरांत प्रवेश न करितां मध्यस्थांच्या (उदाहरणार्थ पिसवा, डांस, माशा, वगैरेसारख्या प्राण्यांच्या) साहाय्याने प्रवेश करितात. अर्थात् ह्या प्राण्यांनी त्वचेस दंश केला असतां किंवा जखमा, व्रण, वगैरेवर हे प्राणी बसले असतां जंतूंनां शरीरांत शिरण्याची आपसूक सोय होते.