या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२ (१) नॅचरल इम्युनिटी:-कित्येक प्राण्यांत स्वाभाविकच अशी एक शक्ति असते की, जे रोग दुसऱ्यांनां सहज होतात, त्या रोगांचा त्यांच्यावर काहींच परिणाम होत नाही. अशा प्रकारच्या शक्तीला नॅचरल इम्युनिटी किंवा रोग न होऊ देण्याची नैसर्गिकशक्ति असें ह्मणतात. उदाहरणार्थ, कोंबडीला धनुर्वात; कबुतरें व कोंबडा यांस काळपुळी; बकन्याला क्षय; हे रोग होत नाहीत. आपल्या आर्यवैद्यशास्त्रज्ञांस देखील ही गोष्ट फार प्राचीन काळापासून समजून चुकली होती असे दिसते. “आज क्षीरं घृतं मांसं च शोपजित्” (वाग्भट-चि. स्थान.) अर्थः-बकरीचे दूध, तूप व मांस यांनी क्षयरोग बरा होतो. सुश्रुतसंहिता ( उत्तर तंत्र अ. ४२) व वृद्ध वाग्भट (चिकित्सास्थान अ. ८) यांत तर "क्षयरोग्याने खच्छ अशा हवाशीर गांवाबाहेरील मोकळ्या जागी रहावें; उदरपोषणास बकरीचे दूध, तूप, मांस, वगैरे खावें". असे स्पष्ट झटलें आहे. यावरून कोणते रोग कोणत्या प्राण्यांस होत नाहीत हे त्यांच्या नजरेस येऊन चुकले होते, असे दिसतें. कित्येक रोग होऊन गेल्यावर ते पुनः न होण्याची त्या इसमाच्या आंगीं शक्ति येते; उदा० –देवी, उपदंश, वगैरे. पण कित्येकदा अशा प्रकारची शक्ति काही काळाने नाहीशी होण्याचा संभव असतो. (२) आर्टिफिशिअलू इम्युनिटी:-जंतूंपासून होणारे रोग टाळण्यासाठी व झालेल्या रोगांवर उपाय करण्यासाठी निरनिराळ्या जंतुशास्त्रवेत्त्यांनी काही शोध लाविले आहेत व शरीर. रोगाभेद्य ( Immune ) करण्याचे त्यांचे आणखीही प्रयत्न चालू आहेत.