या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कृत्रिम रीतीने रोग न होऊ देण्याची जी शक्ति आणतात, त्या शक्तीला आर्टिफिशिअल इम्युनिटी किंवा कृत्रिम उपायांनी आणलेली रोगप्रतिबंधकशक्ति असें ह्मणतात. हिचे निरनिराळे प्रकार आहेतः-(१) जंतू अथवा त्यांपासून तयार केलेली लस यांचे जितकें प्रमाण शरीरास बाधक असेल त्याहून अतिशय कमी प्रमाण थोडथोड्या अवकाशाने शरीरांत घातल्याने त्याची शरीरास संवय होते आणि पुढे तें विष अधिक प्रमाणांत शरीरांत गेल्यास त्यापासून अपाय होत नाही. (२) जंतूंस अथवा त्यांच्या विषास कमजोर (attenuated) करून शरीरांत घातले तर त्यापासून रोग होण्याचे टळते. पिसाळलेल्या प्राण्यांचे विष, कॉलरा, इत्यादि रोगांसाठी असें करितात. (३) जंतूंपासून बनविलेल्या प्रवाही पदार्थास त्या जंतूची लस असें ह्मणतात. ही लस काही विशिष्ट रीतीने शरीरांत घातली तर जंतूंपासून होणारा विशिष्ट रोग टळतो अथवा बरा करितां येतो. उदा०-धनुर्वात, घटसर्प, जलसंत्रास इत्यादि रोग ह्या रीतीने बरे करितां येतात. वर जी दोन प्रकारची रोगप्रतिबंधकशक्ति सांगितली, त्यांपैकी पहिल्या प्रकारची शक्ति (नैसर्गिक रोगप्रतिबंधकशक्ति) ही सशक्त व ज्यांनां वाईट व्यसनें नाहींत अशा लोकांच्या अंगी बहुधा विशेष असते. ब्रह्मचर्य पाळल्याने ही शक्ति वाढते. ह्या शक्तीच्या योगाने पुष्कळ जंतूंचा आपोआप नाश होतो. शरीरांत हा प्रकार कसा होतो, याबद्दल पुष्कळ भिन्न मते आहेत. मेकनीकॉफू साहेबांच्या मते रक्तातील श्वेतकणं [ल्युकोसाइट्स]व घटकावयवसंधानक ( कनेक्टिव्ह टिशू ) यांमध्ये असणारे