या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केलेलें निदान चुकीचे ठरतें तद्वतच केवळ बाह्यं दिखाऊपणावरून क्षीणपणाचें अनुमान ठरविल्यास ते चुकीचे होते. दुसरी गोष्ट अशी की, एखादा मनुष्य दिसण्यांत रोडावलेला दिसतो व एखादा लठ्ठ दिसतो, ह्मणून पहिल्यांत जंतूंचा प्रवेश लगेच होईल आणि दुसऱ्यांत होणार नाही, असें ह्मणणे चुकीचे आहे. याची प्रचीति पाहणे झाल्यास ज्यावेळी एखाद्या घरांत प्लेग किंवा वाखा होतो त्यावेळी लठ्ठ दिसणारी माणसें त्या रोगांस बळी पडून रोडकी व क्षीण दिसणारी माणसें सुरक्षित असलेली आपण पुष्कळदां पहातो. खरी स्थिति अशी असते की, जंतू रक्तांत शिरल्यावर त्यांचा नाश करण्यासाठी रक्तांत असणारे तांबडे व पांढरे रक्तकण एकसारखी आंत शिरलेल्या जंतूंशी झटापट करीत असतात. या झटापटींत ज्यांची शक्ति अधिक असेल ते यशस्वी होतात. या कारणांमुळे बाह्य दिखाऊपणावरून केलेला अजमास चुकीचा ठरतो. एकंदरीत ह्या आंतील नैसर्गिक रोगप्रतिबंधकशक्तीचा अजमास ठरविणे फार कठीण असते. अशा प्रकारे रोगप्रतिबंधकशक्ति जंतूशी झगडण्याला जरी आंत आहे तरी आपण तिला थोडी योग्य प्रकारे जर मदत केली तर विशेष बरें पडते. अशा प्रकारची मदत ह्मणजे आहारविहार, सूर्यप्रकाश, हवा, वगैरे गोष्टींसंबंधाने आरोग्यशास्त्राच्या नियमाप्रमाणे वागून प्रकृति चांगली राखणे, ही होय. ज्या राष्ट्रांतील लोकांची प्रकृति सदृढ व निरोगी असते, तें राष्ट्र सुखाने नांदत असते. तेथे जंतूंचें कांहीं चालत नाही. अशा प्रकारचे उदाहरण जपानी लोकांमध्ये दिसून येते. हे लोक मोकळ्या हवेंत रहात. असून आरोग्यशास्त्राचे नियम उत्तम रीतीने पाळीत असल्याने