या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आतां, आपल्या आयुष्यक्रमांत ह्या रोगजंतूंपासून आपल्याला खतःचा बचाव कसा करितां येईल, ह्यासंबंधानें थोडासा विचार करूं. - वर सांगितलेच आहे की, अंगांत रोगजंतू शिरण्याचे मुख्य तीन मार्ग आहेत. त्यांपैकी पहिला मार्ग ह्मणजे अन्न, हा होय. यासंबंधाने काळजी घ्यावयाची ह्मणजे आपण जे काही खातों किंवा पितों तें स्वच्छ व ताजे असावें. कारण अन्न किंवा पाणी शिळे अगर बासे झाल्याने त्यांत रोगजंतू होऊन मनुष्यास त्यापासून अपाय होतो. हलवाई लोक व इतर दुकानदार जुना झालेला माल, लाले व दुसरे फेरीवाले ह्यांस स्वस्त दराने विकतात व ह्यांच्याकडून तो शाळेतील मुलांस विकण्यांत येतो. अशा नासक्या व कुजक्या मालापासून रोगोत्पत्ति होण्याचा फार संभव आहे. यासाठी आपली मुलें असे पदार्थ किंवा दुकानांतील चहा, काफी, वगैरे निरनिराळे खाद्य पदार्थ न खातील अशी खबरदारी घ्यावी. त्यांना खाऊसाठी शाळेत जातांना पैसे देणे बरे नाही. कित्येक शाळेवरील अधिकारी आपल्या शाळेजवळ अशा प्रकारचा वाईट माल विकला जाऊ नये अशी खबरदारी घेतात. अशी तजवीज करण्याची खरोखरीच आवश्यकता आहे. खाण्याचे पदार्थ नेहमीं झांकून ठेवावेत. त्यांवर माशा बसूं देऊं नयेत. कारण पुष्कळ रोग उदा०-पटकी (आकृति ५ पहा ), टायफॉइड ज्वर, वगैरे रोग्यांच्या मलमूत्रावर बसलेल्या माशा अन्नावर येऊन बसल्यामुळे किंवा अशा रोग्यांचा मल अन्नपाण्यावाटे पोटांत गेल्यामुळे होतात. नारूसारखा रोग ते