या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जंतू असलेले पाणी प्याल्याने होतो. यासाठी अन्नपाण्यासंबंधानें विशेषतः गांवांत हे रोग चालू असतां जितकी जास्त खबरदारी घेतां येईल तितकी घ्यावी. पाणी उकळल्याशिवाय पिऊ नये. खाण्याचे पदार्थ बारीक जाळी लाविलेल्या कपाटांत ठेवावेत. विशेषतः लोणी, दूध व पाणी ही फार काळजीपूर्वक राखावीत. लोणी हे एखाद्या थंड जागी चांगल्या रीतीने झांकून ठेवावें. दूध तर उकळल्याखेरीज वापरू नये. कारण त्यांत गवळी जे पाणी मिसळतात त्यावाटे अगर इतर रीतींनी योग्य काळजी न घेतल्यामुळे शेकडों जंतू आत गेलेले असतात. दूधांत जंतूंची वाढ फार झपाट्याने होत असते. प्रयोगांती असे आढळून आले आहे की, दुधाने भरलेल्या वाटीत मेलेली माशी थोडा वेळ राहिली तर तें दूध विषारी होते. पाण्यासंबंधाने तर वर सांगितलेच आहे. तसेंच जेवतांना आपले हात, पाय, तोंड, धुवून खच्छ वस्त्रे नेसून जेवावें. ह्या बाबतींत मलीन राहिल्याने त्यांवर असलेले जंतू अन्नांत मिसळण्याचा बराच संभव असतो. खाण्याचे एकंदर पदार्थ बाजारांतून आणल्यावर पहिल्याने चांगले साफसूफ करून मग त्यांचा उपयोग करावा. उदाहरणार्थ, भाजीपाला अगर दाणागोटा वगैरे पदार्थ आणल्यावर पहिल्याने त्यांतील माती, केरकचरा, कीड, वगैरे काढून टाकून स्वच्छ केल्यावर मग ते उपयोगांत आणावेत. स्वयंपाकास अगर जेवणाखाण्यास लागणारी भांडी नेहमी साफसूफ ठेवावीत. ती रस्त्यावरील धुळीने कधीही घांसू नयेत. कारण अशा रीतीने भांडी घासल्याने भयंकर रोग होण्याचा संभव असतो. निरनिराळ्या प्रकारच्या रोग्यांची