या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

धुंकी, मलमूत्र, ओकारी, वगैरे रोगजंतुयुक्त घाण रस्त्यावर टाकलेली असते व अशी मलयुक्त धूळ जर आपण आपल्या जेवणाखाण्याच्या भांड्यांना लावू दिली तर त्यांतील रोगजंतू आपल्या पोटांत जाण्याचा बराच संभव असतो. कोणी असें ह्मणतील की, आपण ती भांडी नंतर थंड पाण्याने खच्छ धुवून टाकतो. असे जरी आहे तरी ती भांडी जंतुरहित होत नाहीत, हे लक्ष्यात ठेवावें. अशी भांडी जंतुरहित करावयाची असल्यास बरीच तापवावी लागतील आणि त्यामुळे श्रम व खर्चही फार येईल. सबब सर्वात उत्तम व सोपा मार्ग ह्मणजे आपली नेहमींची चुलीतील राख लाऊन भांडी स्वच्छ करणे, हा होय. घरांत स्वयंपाकी, अगर स्वयंपाकीण असल्यास स्वयंपाक करीत असतांना त्यांच्याकडून खतःची वस्त्रे, अन्न, भांडी, वगैरे बाबतींत पूर्ण स्वच्छता राखली जावी ह्मणून त्यांच्यावर गृहिणीने बारकाईनें नजर ठेवणे अत्यावश्यक आहे. स्वयंपाक्याचे वस्त्र कधीही मलीन असूं नये. सोंवळे फाटलेले असल्यास चालेल पण मळकट झालेलें मुळीच असतां कामा नये. लहान मुलांनां दूध पाजण्याची बोंडली, चमचे, झाऱ्या, वाट्या, बाटल्या, वगैरे भांडी जितकी खच्छ ठेवितां येतील तितकी ठेवावीत. तसेंच मुलें रडू नयेत ह्मणून काही लोक त्यांच्या तोंडांत रबराची तोटी देत असतात, हे फार वाईट आहे. अशा तोट्या सारा दिवस तोंडांत ठेवण्यांत येत असल्यामुळे व योग्य प्रकारें साफ करण्यांत येत नसल्यामुळे जंतुयुक्त होतात. जेवणापूर्वी किंवा कोणताही पदार्थ खाण्यापूर्वी व खाल्ल्यावर तोंड साफ चूळ भरून धुवून टाकावें. होईल तितकें करून दुकानांतन